औरंगाबादमध्ये मनसे-भाजप युती ?

शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (11:48 IST)
आज औरंगाबादेत भाजप-मनसे ची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शासकीय विश्रामगृहावर ही बैठक नियोजित केली जाणार असून भाजपचे पहिल्या फळीतील नेते आणि विरोधी पक्षाचे नेते प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित राहण्याचे सांगितले जात आहे.
 
आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक होण्याची चर्चा सुरु आहे. सध्या मनसे आणि भाजपच्या जवळीकता ची चर्चा जोरानं सुरु आहे.चर्चेला कारण असे की,मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वारंवार भेट होणे आहे. आधी यांची भेट नाशिक मध्ये नंतर मुंबईत झाली .आता आज होणाऱ्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांची भेट देखील होण्याची चर्चा आहे.त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत मनसे आणि भाजप युती होणार की काय ? अशी चर्चा होत आहे.
   
यंदा औरंगाबाद मध्ये शिवसेना देखील महापालिकेच्या निवडणुकात लढण्याची शक्यता आहे.मात्र त्यांच्या समोर भाजप आणि एमआयएम पक्षांचं आव्हान असणार.मनसे देखील निवडणुक लढण्याची चर्चा आहे.त्यामुळे यंदाची औरंगाबाद महापालिका निवडणूक चांगलीच रंगणार अशी चर्चा सुरु आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती