आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप : तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू

मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (21:22 IST)
आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. यानंतर आता अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असोसिएशनकडून निवेदन देत तक्रार करण्यात आली आहे. यावर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू,” अशी माहिती सिंग यांनी दिली. त्या मंगळवारी (१३ सप्टेंबर) अमरावतीत माध्यमांशी बोलत होत्या.
 
डॉ. आरती सिंग म्हणाल्या, “चार दिवसांपासून अनेक संघटना, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशनच्या ५०-६० सदस्यांनी निवेदनं दिली आहेत. तसेच त्यांची बाजू मांडली. आम्ही त्यांची निवेदनं घेतली आहेत. त्यावर आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. त्यांच्याकडून जो सल्ला मिळेल त्यावर विचार करून कायदेशीर कारवाई करू.”
 
दरम्यान, नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कॉल रेकॉर्डिंग केल्यावरून पोलिसांची हुज्जत घातली होती. त्यांनतर खासदार राणांविरोधात अमरावतीत अनेक संघटनांनी निवेदन दिली आहेत. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी ही सर्व निवेदने स्वीकारली आहेत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती