महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी धुळ्याचे आमदार अनूप अग्रवाल नागपुरात पोहोचले आहेत. यादरम्यान विकासासाठी आमदार अग्रवाल यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून निवेदन दिले.
पारोळा रोड चौफुली ते बाळापूर फागणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे चौपदरीकरण करण्याची मागणी आमदार अनूप अग्रवाल यांनी केली आहे. हा रस्ता चौपदरी करणे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सोयीचे होणार आहे. शिवाय एमआयडीसीतील हॉटेल रेसिडेन्सी पार्क ते देसन ॲग्रोपर्यंतच्या सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय असून, अनेक ठिकाणी तुटलेली आहे.