राज्यात अनेक अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण

शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (16:28 IST)
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस  झाला. सकाळपासून मुंबईसह  नवी मुंबई,  वसई, पालघर, रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. 
 
पुणे जिल्ह्यात  ढगाळ वातावरण आहे. हवेतील गारवा मात्र वाढला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातही असेच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे, तसे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
 
वसई विरारमधील शहरी तसेच ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे  हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासून वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाल्या. या पावसाने वातावरणात गारवा  पसरला असला तरी अनेक व्यावसायिकांचे नुकसान झालं आहे
 
रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस आला. अलिबाग ते पोलादपूर या सर्वच तालुक्यात रिमझीम पावसाची हजेरी आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती