याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील इदगाह साल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात शहरातील खाण्यासाठी कापण्यात आलेल्या म्हशी रेड्याच्या चरबीपासून तूप बनविण्याचे काम सुरू होते. म्हशीच्या चरबीपासून तयार करण्यात आलेल्या तुपाचा विविध खानावळी आणि हॉटेल्सना पुरवठा सुरू होता. भिवंडी महापालिका प्रशासनाला याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानं पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी आपत्कालीन विभागाच्या पथकासह या कारखान्यावर छापा टाकला.