Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली

मंगळवार, 23 मे 2023 (12:20 IST)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित आजार झाला हे. त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या बाबत डॉक्टरांकडून अपडेट लवकरच दिले जातील. 
त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले आहे. 

मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Former CM) , खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले होते.
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती