नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारसंघात येणाऱ्या विभागातील पाचही जिल्ह्यात तात्काळ प्रभावासह आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिले.