महाराष्ट्राचा गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे, नगरमध्ये 20 मेंढ्यांचा मृत्यू

गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (14:59 IST)
कोणत्याही वातावरणात हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकताना दिसतात. प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा हाच नित्यक्रम सुरु आहे मात्र वाढलेल्या गारठ्यामुळे अहमदनगर येथे एका मेंढपाळाच्या तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर कोकरेही आता अखेरच्या घटका मोजत आहेत. याशिवाय शेती व्यवसयाशी निगडीत असलेल्यांवर प्रतिकूल वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे.
 
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात विसावा घेतलेल्या मेंढपाळाच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडली असून यात मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे अशा घटना घडत असून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
 
मेंढ्या झोपडीबाहेरत बांधलेल्या असल्यामुळे 20 लहान-मोठ्या मेंढ्या गारठ्याने मृत्युमूखी पडल्याचे मेंढपाळ म्हणाले. यात भारी नुकसान झाले असून आर्थिक मदतीची मागणी मेंढपाळांनी केलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती