भन्नाट ऑफर : लस घ्या, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज मिळवा

गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (10:52 IST)
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन यामुळे अनेक देशांसह भारतही काळजीत आहे. राज्य सरकारने सावध पावलं उचलत अनेक नियम व सूचना जाहीर केल्या आहेत. तसेच हिंगोला जिल्ह्यात संभाव्य ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनातील सर्व घटकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट व लसीकरण दोन्ही मोहिमेला अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. नागरिकांनी वॅक्सीनेशनसाठी पुढाकार घ्यावा यासाठी हिंगोली नगरपालिकेनं भन्नाट ऑफर काढली आहे.
 
हिंगोली नगरपालिकेनं हा आगळा वेगळा उपाय राबवला असून लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लकी ड्रॉची योजना राबवली आहे. या योजनेत पहिले बक्षीस 50 इंची टीव्ही, दुसरे वॉशिंग मशीन, तिसरे फ्रिज अशी बक्षीसे विजेत्यांना मिळणार आहेत. याचबरोबर विविध मिक्सर मिळवा व बक्षिसही दिली जाणार आहेत. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
 
नागरिकांना लस देताना त्यांच्याकडून लकी ड्रॉचे फार्म भरले जाणार आहे. या ऑफरचे बॅनर सुध्दा शहरात लावले जाण्याची महिती दिली जात आहे. सध्या हिंगोलीत करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 73 टक्के तर दुसरा डोस 56 टक्के लोकांनी घेतला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती