तलाठी परीक्षा केंद्रात गोंधळ

सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (11:38 IST)
सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरु असून परीक्षेचे पेपर फुटल्याने एकच गोंधळ उडाला होता. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती या प्रकरणी हायकोर्टात जाणार असून भरती प्रक्रियेत खंड न पडू नये तसेच समिती गठीत करण्याची मागणी केली जाणार आहे.
 
तलाठी भरती परीक्षेमध्ये हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आलं होतं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. यानंतर अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते.
 
तलाठी पदासाठीची परीक्षा 17 ऑगस्ट रोजी झाली. ज्यात नाशिकमधील म्हसरूळ केंद्रात हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी मुख्य संशयित गणेश श्‍यामसिंग गुसिंगे यास उपकरणांसह अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार सचिन नायमाने व परीक्ष केंद्रातील संशयित युवती संगीता रामसिंग गुसिंगे दोघे पसार झाले.
 
या प्रकरणी आयुक्तांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती