SSC HSC Board Exam 2024 दहावी बारावीच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर आल्या असताना या परीक्षांसंदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने प्रलंबित राहिलेल्या मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले आहेत.
जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डांच्या परीक्षाकरता उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा काय आहेत?
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSC आणि HSC च्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणार आहेत. यंदाच्या वर्षी बारावीची शैक्षणिक लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत पार पडणार आहे.
शिक्षण विभागाच्या मागण्या काय आहेत?
वर्ष 2012 पासून रिक्त जागा असून देखील शिक्षक भरती झाली नसल्याने शिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरात लवकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करून घ्यावी.
प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास पूर्णतः विरोध
सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती देणे आवश्यक असावे.