महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून शिवसेना खासदार संजय राऊत हे 10 जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात त्यांच्या बैठका देखील झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे.
संजय राऊतांनी अजित दादांनी पक्ष सोडला की मी लगेच पक्षात प्रवेश करणार असे सांगितले आहे. ते सतत अजितदादांवर टीकास्त्र सोडत आले आहे. मी आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असून आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्यात काहीही अर्थ नाही. असे राऊत यांनी म्हटल्याचं, नितेश राणे म्हणाले.