माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य - नरेंद्र दराडे
गुरूवार, 24 मे 2018 (16:58 IST)
माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य झाला आहे अशी कबुली स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत निवडून आलेले शिवसेना विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी सह अनेकांनी मला मदत केली असा गौप्यस्फोट त्यांनी आज केला आहे.तर दुसरीकडे सर्वाधिक मतदान असलेल्या भाजपने राष्ट्रवादीचे उमदेवार शिवाजी सहाने यांना पाठबळ दिले होते मात्र तरीही प्रत्यक्ष निकालात १९३ मते अधिक मिळाली आहे. तर दुरीकडे पालकमंत्री गिरीश महाजन या निवडणुकीत कोठेही दिलसे नाहीत हे विशेष. त्यामुळे शिवसेनेन हे गणित जमवले कसे असा प्रश्न पडलेला असतांना भुजबळ फॅक्टर मुळेच हे गणित बदलेले असे चित्र समोर आले आहे.भुजबळ यांनी मला मदत केली अशी स्पष्टोक्ती नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दराडे सुद्धा येवला भागातील आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाने यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.तेव्हा मतभेद विसरा तयारीला लागा असे भुजबळ म्हणाले होते. तर मतदानाच्या आधी मिलिंद नार्वेकर भुजबळ यांना भेटले होते. तेव्हाचा सर्व गणित बदलेले गेले होते. भुजबळ यांची पकड अजूनही स्थानिक राजकारणावर आहे असे समोर येतय.
छगन भुजबळ साहेब आजारी असतांना सुद्धा त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवून राजकीय भांडवल करणे हे दुर्दैव
-आ.जयवंतराव जाधव
नाशिक स्थानिक प्राधिकारी संस्थेसाठी असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी ‘माझा विजय छगन भुजबळ यांच्या पाठींब्यामुळे झाला आहे’ असे वक्तव्य केले आहे. दराडे यांनी केलेले हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे. छगन भुजबळ साहेब आजारी असतांना सुद्धा त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवून त्यांच्या आजारपणाच्या काळात राजकीय भांडवल करणे हे दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आ.जयवंतराव जाधव यांनी म्हटले आहे.
आ.जयवंतराव जाधव यांनी म्हटले आहे की, पक्षाशी गद्दारी करणे हे भुजबळ साहेबांच्या रक्तात नाही. भुजबळ साहेब हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून ते लिलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असल्यामुळे त्यांची शिवसेनाच काय तर सर्व पक्षातील अनेक मान्यवर नेते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटत आहे. बिहारचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील तसेच शिवसेनेतील मंत्री विजय शिवतारे, दादा भुसे यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,हर्षवर्धन पाटील आणि भारतीय जनता पक्षाचेही अनेक आमदार नेते त्यांना भेटून गेले. मात्र शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर भेटायला आले म्हणजे विधानपरिषद निवडणुकीशी या भेटीचा संदर्भ जोडणे हे चुकीचे आहे. नार्वेकर हे केवळ भुजबळ साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. मात्र केवळ भुजबळ साहेबांबाबत गैरसमज पसरवण्यासाठी दराडेंनी हे विधान केले आहे.
भुजबळ साहेबांवर दोन दिवसांपूर्वीच अॅन्जीओग्राफी करण्यात आली आहे. कालच त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आलेली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पीटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. भुजबळ साहेब हे राष्ट्रवादीचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष असून ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. कार्यकर्त्यांना पक्षाविरोधात काम करण्याचा त्यांनी कधीच सल्ला दिलेला नाही. खरंतर राष्ट्रवादीचे केवळ १०० मते असतांना २३२ मतांपर्यंत राष्ट्रवादीने मजल मारली आहे. केवळ भुजबळ साहेबांच्या अनुपस्थितीचा शिवसेनेला फायदा झाला असून ते पूर्ण वेळ नाशिकमध्ये असते तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता. मात्र वैद्यकीय उपचार घेत असलेल्या छगन भुजबळ यांच्याबद्दल गैरसमज पसरविणे हे राजकीय हेतून प्रेरित असल्याचे आ.जाधव यांनी म्हटले आहे.