महाराष्ट्र केसरीचा 'किताब नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला

सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (11:22 IST)
उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा 'किताब नाशिकच्या बाळू बोडखे यांना पराभूत करून  नगरच्या सुदर्शन महादेव कोतकर याने पटकावला . महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखाना यांच्या वतीने  या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केदारेश्वर चे अध्यक्ष प्रताप ढाकणे आणि तिसगाव चे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी कुस्ती लावली. कोतकर आणि बाळू बोडखे यांच्यात अंतिम लढत मध्ये बोडखे यांना उचलून खाली पाडले आणि महाराष्ट्र केसरी झाले. कोतकर यांचे वजन १२४ किलो तर बोडखे यांचे वजन ८४ किलो असल्याने लढत एकतर्फी होण्याची दाट शक्यता होती. बोडखे यांनी कोतकर यांना अखेर पर्यंत चांगली झुंज दिली. दोघात स्पर्धा जोरदार होती. दोघेही एकमेकांनाच आवारात नव्हते. शेवटी बाळू यांना कोतकरने उचलून खाली पाडले. पंचानी या लढतीचे चित्रीकरण तपासत कोतकर यांना विजयी घोषित केले. अशा प्रकारे नगरच्या सुदर्शन कोतकर यांना महाराष्ट्र केसरी होण्याचा 'किताब मिळाला. कोतकर यांना   चांदीची गदा आणि ५१ हजार रुप्याचे पारितोषिक देण्यात आले . या समारंभाला प्रताप ढाकणे, वैभव लांडगे, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष शिवशंकर राजळे ,काशिनाथ पाटील लवांडे, रफीक शेख, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. दीपक देशमुख, सिद्धेश ढाकणे,  राजेंद्र शिरसाठ,  अजय शिरसाठ उपस्थित होते.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती