HMPV virus news: नागपुरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी एचएमपीव्ही विषाणूच्या चिंता दूर करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज दुपारी तीन वाजता सेंट जॉर्ज हॉस्पिटल हेल्थ सेंटर, मुंबई येथे होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे ही या बैठकीला उपस्थित राहणार आहे. नागपुरातील 7 आणि 14 वर्षे वयोगटातील दोन मुलांची HMPVचाचणी पॉझिटिव्ह आली, ज्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या सात झाली. तीन जानेवारी रोजी या मुलांना ताप आणि खोकल्याच्या उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. चाचण्या घेतल्यानंतर, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली.