राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढीव भत्त्याची रक्कम १ आॅगस्ट २०१७ पासून रोखीने देण्याचा आदेश आज वित्त विभागाने काढला आहे. १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढले जातील, असे सांगण्यात आले आहे. ही रक्कम रोखीने कधी दिली जाणार, हे निश्चित नसले तरी ती दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्याना मिळण्याची शक्यता आहे.
महागाई भत्त्याची रक्कम देण्यासाठी विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे तशीच यापुढेही चालू राहील. तसेच हे आदेश सुधारित वेतनश्रेणीमध्ये व अशा वेतनास लागू असलेल्या संस्थांमधील कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.