Konkan Railway News: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास महाराष्ट्र सरकार मान्यता देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्यांनी सांगितले की या निर्णयाचा फायदा केआरसीएलला होईल.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वाहतूक सुरक्षेसाठी कोकण रेल्वेमध्ये मोठे बदल आवश्यक आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची पायाभूत सुविधा २५ वर्षांहून अधिक जुनी आहे, त्यामुळे वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भांडवली मालमत्तेचे मोठे नूतनीकरण आवश्यक आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आता महाराष्ट्र सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास महाराष्ट्र सरकार मान्यता देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे केआरसीएलला आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर त्यांचे नाव 'कोकण रेल्वे' राहील.