LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना

बुधवार, 12 मार्च 2025 (21:30 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससी परीक्षा मराठीत घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

केंद्र सरकारने ० ते ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, अशा ग्राहकांना छतावरील सौर पॅनेल प्रदान केले जात आहे. सविस्तर वाचा

औरंगजेबाचे कौतुक करून चर्चेमध्ये आलेले समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा

हिंदूंसाठी झटका मटण आणण्याच्या मंत्री नितेश राणे यांच्या कल्पनेला काँग्रेसने कडून विरोध केला आहे. काँग्रेस आमदार आणि माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे पाऊल असल्याचे म्हटले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना लगाम घालावा अशी मागणी केली. सविस्तर वाचा

अल्कोहोलसोबतच ड्रग्जचे सेवन देखील तपासले जाईल. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली. सविस्तर वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवारांची डोकेदुखी वाढली आहे. आता त्यांच्या आमदाराने स्वतःला उघड केले आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील मुंबईती चारकोप परिसरात एअरटेल कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की,  धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबतचे नियम पूर्णपणे पाळले जात नाहीत. जर काही त्रुटी आढळल्या तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कायदा बदलण्याचे संकेत दिले. सविस्तर वाचा

महाराष्ट्रात काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आज म्हणजेच १२ मार्च रोजी पहिली सुनावणी होणार आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिकी कराड हा गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील नितेश राणे यांच्या 'झटका' मटणाने राज्यातील लोकांना धक्का दिला आहे. यावर संजय राऊत यांनी मल्हार सर्टिफिकेटवर निवेदन दिले आहे. त्यांनी याला मूर्खपणा म्हटलेआहे. सविस्तर वाचा

बीड मध्ये दहशत निर्माण करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय आणि फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याभाईला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर बेकायदेशीर शिकार आणि हल्ल्याचे गुन्हे दाखल आहे. त्यांना हत्येच्या प्रयत्नासह इतर प्रकरणात उत्तरप्रदेशातील प्रयागराज मधून अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. सविस्तर वाचा ..... 

सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यावर न्यायालयाने पोलिसांना आणि अबू आझमींना सूचना दिल्या आहे. . सविस्तर वाचा ..... 

महाराष्ट्रातील मुंबई पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण हरियाणा विद्यापीठाचा प्राध्यापक असल्याचा दावा करत आहे. पोलिसांना मानवी तस्करीचा संशय आहे. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा केली की राज्यातील कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीच्या व्यावसायिक दुकानांमध्ये नवीन दारू किंवा बिअर शॉप उघडण्यासाठी संबंधित सोसायटीचे एनओसी अनिवार्य आहे. सविस्तर वाचा


महायुती सरकार ने विधानसभेत आगामी वर्ष 2025 -26चा अर्थसंकल्प सादर केला.महाराष्ट्र विधानसभा निवणुकीपूर्व सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये सरकारने मोठी कपात केली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे बजेट 46 हजार कोटी रुपयांवरून 36 हजार कोटी रुपये केले आहे.. सविस्तर वाचा ..... 
 

पुण्यातील धनकवडी येथे आयुर्वेदिक मसाज सेंटर चालवणाऱ्या महिलेला धमकावून पैसे उकळण्याचा आरोपाखाली सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. . सविस्तर वाचा ..... 

मुंबईतील प्रतीक्षा नगर बस डेपो जवळ एका वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यावर लोकांनी पोलिसांना सदर माहिती दिली. मृतदेह कुजलेले असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. . सविस्तर वाचा .....

राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत मोठे विधान केले आहे. पीओपी बंदीच्या विरोधात मुंबईतील परळ येथील नारे पार्क येथे राज्यातील विविध संघटनांनी शिल्पकारांची एक परिषद आयोजित केली होती. यामध्ये पीओपी मूर्तींवरील बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली.. सविस्तर वाचा ..... 

चेंबूर लालडोंगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत10 सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे आणि ही योजना 30,856.50  चौरस मीटर सरकारी जमिनीवर चालवली जात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) मंजूर केलेल्या आराखड्यानुसार हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि महानगरपालिकेने पूर्णत्व प्रमाणपत्र जारी केले आहे. विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, या प्रकल्पातील समस्यांवर त्वरित कारवाई केली जाईल.सविस्तर वाचा ...

राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत मोठे विधान केले आहे. पीओपी बंदीच्या विरोधात मुंबईतील परळ येथील नारे पार्क येथे राज्यातील विविध संघटनांनी शिल्पकारांची एक परिषद आयोजित केली होती. यामध्ये पीओपी मूर्तींवरील बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली.सविस्तर वाचा ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससी परीक्षा मराठीत घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता..सविस्तर वाचा ...
 

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात शिवशाहीच्या बंद बस मध्ये 25 फेब्रुवारी रोजी आरोपी दत्ता गाडे याने एका 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करून पसार झाला. आरोपीला पोलिसांनी शिरूर तालुक्यातीलगुनाट गावातून तीन दिवसांनी अटक केली. .सविस्तर वाचा ...
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती