महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : महाराष्ट्र भूषण पुरस्कारात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

रविवार, 16 एप्रिल 2023 (13:13 IST)
राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार नवी मुंबईतील खारघर येथे आंतराष्ट्रीय कार्पोरेट मैदानावर सुरु असून या महासोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली  असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला  यंदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पदमश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला आहे.  

या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल.सकाळी साडे दहाच्या सुमारास  सोहळा  समारंभ सुरु झाला .या सोहळ्यात दरम्यान पदमश्री अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येईल. या सोहळ्यात मुख्यमंत्री  शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारसह  धर्माधिकारी कुटुंब उपस्थित  आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला. 
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती