LIVE: रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (21:30 IST)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. 
 

09:29 PM, 19th Nov
रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पैसे वाटप केल्याच्या आरोपांदरम्यान शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नोट जिहाद म्हणत भाजपचा खरपूस समाचार घेतला. सविस्तर वाचा .....

07:08 PM, 19th Nov
विधानसभा निवडणुकीसाठी 30 हजारांहून अधिक पोलीस तैनात
बुधवारी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत 30,000 हून अधिक पोलीस कर्मचारी सुरक्षा कर्तव्यावर तैनात करण्यात आले आहेत .

06:53 PM, 19th Nov
अटकेवर राज्याच्या गृहखात्याने लक्ष ठेवले संजय राऊत यांचे विधान
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरूच आहे.निवडणूक प्रचारानंतर बुधवारी (20 नोव्हेंबर) राज्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीवर केवळ देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

06:36 PM, 19th Nov
विनोद तावडे यांच्या बचावासाठी भाजपचा विरोधकांवर बदनामी केल्याचा आरोप
महाराष्ट्र निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर रोख रक्कम वाटल्याच्या आरोपात EC ने एफआयआर दाखल केली आहे.

05:39 PM, 19th Nov
मतदानापूर्वी नाशिकच्या हॉटेलमधून 1.98 कोटी रुपये जप्त
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी नाशिकच्या हॉटेल मधून 1.98 कोटी रुपये जप्त करण्यात आले

05:17 PM, 19th Nov
महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 नेत्यांवर दगडफेक, डोक्याला दुखापत
उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे. या पूर्वी सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. या मध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली असून सोमवारीच सांयकाळी आणखी एका नेतावर हल्ला करण्यात आला.

04:41 PM, 19th Nov
मतदानापूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

03:58 PM, 19th Nov
निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का, सदानंद थरवळ शिंदे गुटात सामील
उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणुकीपूर्व मोठा धक्का बसला आहे. सविस्तर वाचा ...... 

03:09 PM, 19th Nov
निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडी कडून भाजप नेता विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप
महाराष्ट्र निवडणूक: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी, भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर गदारोळ झाल
BJP के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े महाराष्ट्र के एक होटल में पैसे बांटते हुए पकड़े गए हैं।
विनोद तावड़े बैग में भरकर पैसे लेकर गए थे और वहां पर लोगों को बुला-बुलाकर पैसे बांट रहे थे।
ये खबर जब जनता को पता चली तो भारी हंगामा हो गया। पैसों के साथ विनोद तावड़े के कई वीडियो… pic.twitter.com/iqbMcGJtyQ
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना तावडे म्हणाले की, जर पैसे वाटण्यात आले असतील तर त्याची चौकशी निवडणूक आयोगाने करावी

02:23 PM, 19th Nov
मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे मान्य
विधानसभा निवडणूक उद्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर बुधवारी 20 नोव्हेंबर सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळी मतदान होणार आहे. मतदारांना आवाहन आहे की, मतदार ओळखपत्रासह आणखी एक ओळखपत्र (Voter ID) घेऊन मतदानासाठी केंद्रावर जावे.

02:04 PM, 19th Nov
आमदार आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार प्रताप अडसाद यांच्या बहिणीवर हल्ला
महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार प्रताप अडसाद चाकू हल्ल्यात बहिण जखमी झाली आहे. सविस्तर वाचा

02:00 PM, 19th Nov
आमदार आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार प्रताप अडसाद यांच्या बहिणीवर हल्ला
महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार प्रताप अडसाद यांची बहिण चाकू हल्ल्यात जखमी झाली आहे. सविस्तर वाचा 

12:45 PM, 19th Nov
केंद्र सरकारला महाराष्ट्राला गुजरात बनवायचे आहे-संजय राऊत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा 
 

11:15 AM, 19th Nov
नाशिकच्या हॉटेलमधून मतदानापूर्वी कोट्यवधींची रोकड जप्त
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी नाशिकमधील पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान नाशिकमधील एका हॉटेलमधून 1.98 कोटी रुपये जप्त केले आहे. सविस्तर वाचा 

10:13 AM, 19th Nov
मुंबईत 3 लाख नवीन मतदार मतदान करणार
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सकाळी 07:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत मतदान होईल. सविस्तर वाचा 

10:11 AM, 19th Nov
नागपूर : काँग्रेस फडणवीसांचा बालेकिल्ला मोडणार?
महाराष्ट्रात भाजपसाठी अधिकाधिक जागा जिंकण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे आणि स्वत:ची जागा जिंकण्याचेही लक्ष्य आहे. सविस्तर वाचा 

10:09 AM, 19th Nov
भाजपने अनिल देशमुखांवर हल्ला केला', मुलगा सलीलचा आरोप
राष्ट्रवादी-एससीपी नेते अनिल देशमुख यांचा मुलगा आणि काटोल मतदारसंघातील उमेदवार सलील देशमुख यांनी मंगळवारी सांगितले की, भाजपने वडिलांवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. सविस्तर वाचा 

10:05 AM, 19th Nov
छत्रपती संभाजीनगर मध्ये अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला सविस्तर वाचा 

10:03 AM, 19th Nov
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान
बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार गेल्या सोमवारी संपला. तसेच राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर एकाच दिवशी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. सविस्तर वाचा 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती