महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांची झुंबड

बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (08:28 IST)
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असलेली पर्यटन स्थळं सुरू झाल्याने दिवाळीच्या निमित्ताने पर्यटकांनी पुन्हा एकदा फिरायला सुरुवात केली आहे. महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटकांची झुंबड पाहायला मिळत आहे.  कौटुंबिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी थंड हवेचे ठिकाण व राज्याचे  परिसर पर्यटकांनी बहरला असून कोरोना संसर्गाने काटेकोर पालन करण्याचा दोन्ही पालिकांचा प्रयत्न आहे. पालिकांनी महाबळेश्वर पाचगणी शहरे कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. पर्यटनस्थळांवर यंदा दिवाळीच्या सुट्यांनाच जोडून वीकेण्ड आल्याने गर्दी होऊ झाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या हॉटेल्सचे आरक्षण फुल्ल झाले आहे. पर्यटकांच्या गर्दीत २५ नोव्हेंबर पर्यन्त  आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यटन सुरु झाल्याने आर्थिक चणचण कमी होईल .रोजदारी व छोटे मोठे हातावरचे उद्योग सुरु झाल्याने स्थानिकांसह हॉटेल चालकांमध्ये उत्साह आहे.
 
पाचगणी व महाबळेश्वरमधील व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने दिवाळी सुरू होण्यापूर्वीच हिवाळी हंगामासाठी सज्ज केली होती. रंगरंगोटी, दुकानांची डागडुजी करुन नवनवीन वस्तू दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही शहरातील हॉटेल व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आले असून येथील हॉटेलच्या सर्व रूम बुक झाल्या आहेत. त्यामुळे कोणतेही नियोजन न करता पर्यटनाला येणा-या नागरिकांना मात्र कसरत करावी लागत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर बोटिंगसाठी सर्वाधिक गर्दी होत असून, हॉर्स रायडिंगलाही पर्यटक पसंती देत असल्याचे दिसून येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती