मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी सरवर शेख हे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून तपोवन एक्सप्रेस गाडीतून प्रवास करताना मनमाड जंक्शनवर आल्यावर डब्यातून खाली पडले. ट्रेनच्या लोको पायलटला ही माहिती मिळाल्यावर त्याने कंट्रोलरची परवानगी घेतली आणि जखमी शेख यांना उचलण्यासाठी चक्क ट्रेन रिव्हर्स गिअर मध्ये नेली. या ट्रेनसाठी मागून येणारी मालगाडी स्थानकाच्या पूर्वी थांबवण्यात आली जेणे करून ट्रेनसाठी जागा मिळावी.