छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर एक लोकल ट्रेन रुळावरून घसरली आहे. त्यामुळे हार्बर मार्ग विस्कळीत झाला आहे. दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सोमवारी दुपारच्या सुमारास अशीच घटना घडली होती. त्यानंतर आज ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मध्य रेल्वेने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीएसएमटी स्थानकाजवळ सदोष जागेची दुरुस्ती केल्यानंतर चाचणीदरम्यान मुंबई लोकलच्या रिकाम्या रेलची दोन चाके रुळावरून घसरली. त्यामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड स्थानकादरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. मात्र, रुळावरून घसरलेला डबा18.25 वाजता पुन्हा रुळावर आणण्यात आला. मात्र गाड्यांची वाहतूक सुरू झालेली नाही.