राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदी उठवा

शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (20:19 IST)
जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल केला जात आहे.  राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदीवरून केंद्रानं राज्यांना फटकारलं आहे. त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे निर्दश दिले आहेत.
 
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात पत्र लिहून निर्दश दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी पत्रात म्हटलं आहे की, “केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको,” असं स्पष्ट केलं आहे.
 
“राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीवर लादण्यात आलेल्या बंधनाचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरील मालाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. विस्कळीत व्यवहारांचा परिणामुळेच बेरोजगारी देखील वाढत आहे, असं भल्ला यांनी म्हटलं आहे.भल्ला यांनी राज्यांना अनलॉक ३ नियमावलीचा संदर्भही दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती