कुर्ल्यातील ते सरबत दुकान अखेर बंद व्हायरल व्हीडीयोने केला होता गलीच्च्छ कारभार उघड

बुधवार, 27 मार्च 2019 (08:27 IST)
मुंबई येथील लोकल कुर्ला स्थानकावर छप्पर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पादचारी पुलावरून स्थानकावरील सर्व हालचाली दिसतात, त्यामुळे लिंबूवाला कशाप्रकारे लिंबू सरबत बनवित आहे, हे घाणेरडे चित्र समोर आले आहे. याबद्दल प्रवाशाने लिंबू सरबत वाल्यांचा व्हिडीओ काढून रेल्वेप्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तो किती घाण प्रकारे लिंबू सरबत बनवतो हे दिसून आले आहे. लिंबू पाणी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच लिंबू सरबत बनविणारा त्याचे घाणेरडे हात धूत होता आणि त्याच पाण्यात सरबत बनववत होता. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सोशल मीडियावरून लिंबू सरबतवाल्यांचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या विरोधात युजर्संकडून राग व्यक्त केला आहे. लिंबू सरबत वाल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया युजर्संनी व्यक्त केली. त्यामुळे शेवटी रेल्वे प्रशासन जागे झाले असून हा ठेला बंद केला आहे. या घाणेरड्या प्रकारे सरबत बनवल्याने हा ठेला चर्चेत आला होता. या दुकानाप्रमाणे इतर दुकानांची चौकशी करा अशी मागणी होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती