कुरिअरद्वारे मोठा शस्त्रसाठा जप्त, सापडल्या 37 तलवारी, एक कुकरी

बुधवार, 30 मार्च 2022 (16:06 IST)
औरंगाबाद शहरात एका कुरिअरद्वारे मोठा शस्त्रसाठा दाखल झाला आहे. यात तलवारी आणि कुकरीचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी आणि शस्त्र कुणी मागवली, कुणी पाठवली, याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र अचानक एवढा साठा कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे. शहरात हा शस्त्रसाठा आल्याची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो जप्त केला आहे. यात 37 तलवारी, एक कुकरी जप्त करण्यात आली आहे. 
 
क्रांती चौक पोलिसांनी सदर शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, DTDC कुरिअरद्वारे सदर शस्त्रसाठा शहरात पोहोचला. या पार्सलवर संशय आल्यानंतर सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. क्रांती चौक पोलिसांनी सदर पार्सल ताब्यात घेतल्यानंतर त्यातील शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती