kolhapur : हत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचे स्वागत केले

रविवार, 28 मे 2023 (12:12 IST)
kolhapur : आजच्या काळात वंशाचा दिवा म्हणून मुलाची अपेक्षा करणारे लोक आहे तर मुलगी घराचे धन आहे असे मानणारे लोक देखील आहे. कोल्हापुरात गिरीश पाटील आणि त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनी समाजापुढे एक चांगले उदाहरण दिले आहे. कोल्हापुरात कागल तालुक्यात पाचगाव येथे गिरीश पाटील आणि मनीषा पाटील यांना पाच महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाली. मनीषा आणि गिरीश यांचे हे पहिले अपत्य असल्यामुळे त्यांच्या माहेरी बाळ झाले. बाळ पाच महिन्याचे झाल्यावर मनीषा आपल्या घरी बाळ घेऊन आल्यावर पाटील कुटुंबीयांनी आपल्या मुलीचे हत्तीवरून मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत केले. 

या मिरवणुकीत लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत नटवले होते. लेकीचे स्वागतासाठी ढोलताशा आणि मर्दानी खेळ आयोजित केले होते. तुतारी आणि ढोल ताशांच्या गजरात तिचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. 
 
मुलगी नको मुलगाच हवा असा विचार करणारे आपल्या समाजात अनेक आहे. मुलगी जन्माला आली म्हणून तिचे जंगी स्वागत करणारे पाटील कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श ठेवले आहे. आपल्या लेकीची हत्तीवरून मिरवणूक काढून तिचे स्वागत करणाऱ्या पाटील कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती