या कायद्यासाठी स्थापन केलेल्या समिती बद्दल बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, लव्ह जिहादवर कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्रात तरुणींचे शोषण होत आहे ही फसवणूक थांबवण्यासाठी असा कायदा महाराष्ट्रात येणे आवश्यक आहे. ही गुंडगिरी कुठेतरी थांबावी या साठी अशा कायद्याची नितांत गरज आहे.
विरोधी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी लव्ह जिहाद कायद्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, या सरकारने फसवणूक करून, पैसे वाटून आणि मतदार यादीत घोटाळा करून निवडणूक जिंकली आहे. देशात जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथे तिथे हे लोक लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे मुद्दे उपस्थित करून वातावरण बिघडवण्याबद्दल बोलतात.
या प्रकरणी संजय राऊतांवर किरीट सोमय्यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, संजय राऊतांनी इस्लाम धर्म स्वीकारला असून उद्धव ठाकरेंसह हिरवा झगा घालून फिरतात. मी घाटकोपरला गेलो होतो. तर आठ मशिदींवर विना परवाना लाऊड स्पीकर लावले होते. ही गुंडगिरी आता महाराष्ट्रात रोखली जाईल.