महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी आरोप केला की, “कर्नाटकातील मराठी भाषिकांनी मराठी भाषिक लोकांची परिषद आयोजित केली होती. या देशात कोणीही कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊ शकतो आणि संमेलन आयोजित करू शकतो, पण कर्नाटक सरकारने दडपशाही चालवत माजी आमदार, माजी महापौर आणि संमेलनाचे आयोजन करणाऱ्या मराठी एकिकरण समितीच्या 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे मराठी भाषिक बंधू-भगिनींना अटक करत आहे...मी त्याचा निषेध करतो, आमचे सरकार आणि महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे.