कराड : ज्या माणसाला स्वत:चे नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो? भाजपनेच त्यांना गुरुजी बनवले आहे. त्यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे, अशी बोचरी टीका आमदार भाई जगताप यांनी भिडे गुरुजी या नावावरून भाजपवर केली.
आमदार जगताप म्हणाले, लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन दीडशे वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या स्वातंत्र्यवर टीका करणारा हा माणूस. याला माथेफिरू हा शब्दही सौम्य झाला आहे. ज्या माणसाला स्वत:चे नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो?