याबाबत अधिक माहिती अशी की, हर्ष आवटे (वय, 8 वर्ष) आणि आदर्श आवटे (वय, 6 वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. तर अनुष्का सुजित आवटे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून पतीचा विरह सहन होत नसल्याने आम्ही आमचे जीवन संपत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. अनुष्का यांचे पती सुजित यांचा सुमारे सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा विरहामुळे आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या दरम्यान, अनुष्का यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.