कालिदास नाट्यमंदिर नाट्य : मनसे मुळे दामले नरमले

कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत काल फेसबुक पोस्ट केल्यानंतर वाद चिघळण्याची शक्यता असतानाच अभिनेते प्रशांत दामले यांनी नार्मैची भूमिका घेतल्याचे दिसते. आज सकाळी त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये मनसेच्या चित्रपट सेनेचे मेय खोपकर यांनी कालिदास कलामंदिराच्या नुतनीकरणाचे मॉडेल पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.
 
प्रशांत दामले यांनी नाशिकच्या सर्वात मोठ्या कालिदास कलामंदिरचे सोशल मिडीयावर वाभाडे काढल्यानंतर सत्ताधारी मनसेच्या जिव्हारी लागले होते. तुम्हाला जर इतका त्रास होता आणि राजसाहेब तुमचे मित्र आहेत तर तुम्ही त्यांना का सांगितले नाही असा प्रश्न अमेय खोपकर यांनी दामले यांना विचारला होता. त्याचप्रमाणे त्यांनी दामले यांना कलामंदिराचे नुतनीकरणाचे दोन मॉडेल पाठवले. ते बघून दामले यांचा संताप निवळला असल्याचे दिसून येत असून त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये  म्हटले आहे की, रंगमंदिराचे रंगमंदिराची model 1 आणि model 2 तयार आहेत… एवढी जबरदस्त तयारी असेल तर, मला रसिकांना आणि कलाकारांना चिंताच नाही… फक्त तोपर्यंत आहे ते प्रशासनाने नीट राखावे..’
 
नाशिकात सुशोभीकरणाची अनेक कामे मराठी ताऱ्यांना दाखवणाऱ्या राज ठाकरेंना कालिदास कलामंदिराची नुतनीकरण करण्याची घाई का दाखवता आली नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मनसेची या कामाबाबत दिरंगाई झालेली झाक्ताना करणे देताना दमछाक होत आहे.
 
सोशल मिडियावर मनसेसह स्वतः दामले यांच्यावर देखील टीका करण्यात आली. दामले मुंबईत राहतात मात्र मुंबईतील खड्ड्यांचा फोटो का नाही टाकला यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर दामले यांनी २४ तासाच्या आत आपली भूमिका बदलल्याने त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. तूर्तास मात्र वाद संपला असून दामले यांनी wait and watch ची भूमीचा अंगिकारली असून राज ठाकरेंची कालिदास कलामंदिराची तयार असलेली दोन मॉडेल्स प्रत्यक्षात कधी येतील याबाबत शंकाच आहे.

वेबदुनिया वर वाचा