Jejuri : जेजुरीचा खंडोबा मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद, कारण जाणून घ्या

रविवार, 27 ऑगस्ट 2023 (12:05 IST)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाला भाविकांची प्रचंड गर्दी असते. अभिषेक, महापूजा, भाविक इथे करतात. पण जेजुरीचे खंडोबा मंदिर येत्या सोमवार 28 ऑगस्ट पासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.

पुरातत्व  विभागाकडून खंडोबाच्या गडामधले मुख्य स्वयंभू लिंगाचा गाभारा आणि अश्वाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीकाम हाती घेणार आहे. या कारणास्तव भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. भाविकांना कुलधर्म कुलाचार करता येईल. नेहमी प्रमाणे खंडोबाची त्रिकाळ पूजा सुरु राहणार आहे. भाविकांना गाभाऱ्यात दर्शनासाठी जाता येणार नाही. खंडोबा गडाचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. या विश्वस्त मंडळाच्या समितीमध्ये पुजारी, सेवक, नित्य वारकरी, नेमले आहे. 
 
हे बांधकाम 5 ऑक्टोबर म्हणजे अवघे दीड महिना चालणार आहे. त्यामुळे भाविकांना कासवांपासूनच देवाचे दर्शन घेता येणार. कुलधर्म कुलाचार गडावर करता येणार आहे. 

देवाच्या मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असल्यामुळे भाविकांना अभिषेक व पूजा पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करता येईल. या मुख्य आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करण्यात येईल. त्यावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये या साठी मुख्य मंदीरात पूजा करून घेण्याची मागणी केली आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती