जरांगे-पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत केली टीका

शनिवार, 6 जानेवारी 2024 (12:26 IST)
मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यावरून जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ पुन्हा समोरा-समोर आले आहेत. आता माध्यमांशी बोलतांना  जरांगे-पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत टीकास्र डागलं आहे. “ते येड आहे, लय शहाणं आहे का? तूच लय शहाणं आहे आणि सरकार येड आहे का? नोदींबाबत सरकारला काहीच कळत नाही का? मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्यानं भुजबळांच्या पोटात दुखत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, ही भुजबळांची भूमिका आहे,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला.
 
“भुजबळांनी सगळ्यांच्या टाळुवरचं लोणी खाललं आहे. फुकट खाऊन भुजबळ बरळत असतात. २० जानेवारीला मराठे मुंबईत जाण्यासाठी निघणार आहेत. भुजबळांनी कितीही आडवं आलं, तरी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवणारच,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती