जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाबा साहेब जुंबड यांची कन्या शीतल हिने कुटुंबाचाच नव्हे तर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विक्रम मोडीत काढला आहे. शीतलने बाल विकास प्राथमिक विद्यालय, जालना येथून पहिली ते चौथीपर्यंतचे, सरस्वती भुवन हायस्कूलमधून पाचवी, परतूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातून सहावी ते दहावी, इंदेवाडी येथील विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयातून 11वी आणि 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
GRE आणि TOEFL या परीक्षेत तिला यश मिळाल्यावर तिला युएसएच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ उटाहमध्ये प्रवेश मिळाला. या उच्च पदवीच्या दुसऱ्या वर्षात त्यांची सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून निवड झाली. यासाठी त्यांना 3 कोटी 60 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.ती इतर मुलींसाठी आदर्श आहे. तिच्यावर तिच्या पालकांना मोठा अभिमान आहे.