जळगाव : शिवसेना महापौरांच्या निवासस्थानावर पेटत्या सुतळी बॉम्बसह दगडफेक

शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (15:21 IST)
गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी  रात्री अकराच्या सुमारास शहरातील मेहरुण परिसरात धक्कादायक प्रकार घडला. मेहरुण परिसरातील महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानावर एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाके, गुलाल उधळत दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अठरा संशयितांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
 
महापौरांच्या मोटारीच्या काचाही फोडल्या –
मेहरुण परिसरात महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानाजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या निवासस्थानावर गुलाल फेकत दगड व पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले. यानंतर कार्यकर्त्यांनी गणरायाची मूर्ती तिथेच सोडून देत पळ काढला. पळून जाण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या मोटारीच्या काचाही फोडल्या.
आमच्या घरात वयस्क व्यक्तीचे नुकतीच शस्त्रक्रिया झाली अहे. त्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे तुमची मिरवणूक पुढे न्या, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचे वाईट वाटून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संशयित योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्‍वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयूर बाळकृष्ण सांगळे यांच्यासह १८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती