सध्या राज्यात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने झोडपले आहे. येत्या 3 दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून राज्यातील बहुतांश भागात पाऊसाची उघडीप होण्याची शक्यता आहे तर किनारपट्टू, घाटमाथा, आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार मेघसरी कोसळणार अशी शक्यता वर्तवली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र विदर्भ, घाटमाथा भागात असलेला पावसाचा जोर शुक्रवारी कमी झाला असून पुढील तीन दिवस या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.