इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीत दरड कोसळली आणि जवळपास 200 लोकवस्तीचे हे गाव एकदम हरवूनच गेले आहे. मदतकार्य सुरू आहे, पण मुळातच दुर्गम भाग त्यात पाऊस यामुळे त्यात अडथळे येत आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू तर 98 व्यक्तींना शोधण्यात यश मिळाले आहे.
दुर्घटनास्थळी मोफत शीवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार- छगन भुजबळ
आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार, त्याच बरोबर 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार. जो पर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असून जिल्हाधिकारी यांना याबाबतचे आदेश तातडीने दिले आहेत.