कालपासून कोल्हापूरात ताणावाचे वातावरण असताना आज कोल्हापूर बंदची हाक दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी शहरात दंगल उडाली. काही ठिकाणी दगडफेक आणि दुकांनांची तोडफोड करण्य़ात आली. पोलीसांची अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हा शांत ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर जिल्हा पोलीस प्रमुख राजेंद्र पंडित यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन केले आहे.
सोशल मीडीयाद्वारे चुकीची माहीती किंवा अफवा पसरू नयेत आणि त्यातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज रात्री आणि उद्या दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठवला होता. आज दुपारी राज्याच्या गृहमंत्रालयाच्या सचिवालयातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून त्यात येत्या 31 तासासाठी इंटरनेट सुविधा बंद असणार असल्याचे म्हटले आहे.