कुत्र्याला गुंगीचे औषध देत दरोडा टाकणाऱ्या आतराज्यीय टोळीला पकडले

सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (14:42 IST)
घरावर पाळत ठेवून परिसरात जर कुत्रे असतील तर त्यांना बेशुद्ध करत घर फोडून दरोडा टाकनाऱ्या नाशिक ग्रामीण पोलीस यांनी आतराज्यीय  टोळीला पकडले आहे. तत्यामुळे पुढे तपासात अनेक गुन्हे उकल होणार आहेत.
 
शहरासह जिल्ह्यामध्ये दरोडे, घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले असताना नाशिकच्या दिंडोरी तालुक्याच्या ढकांबे येथून जबर दरोड्याची घटना घडली होती. नाशिक-पेठ रस्त्यावरील एका बंगल्यात रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात आंतरराज्य टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिक शहरातील आणि मध्य प्रदेशातील चार संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे.
 
ढकांबे येथे मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी लूट केली होती. संशयितांनी कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून घरात प्रवेश केला आणि बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि ८ लाख ५० हजार रुपयांच्या रोख रक्कमसह एकूण १७ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरुन नेला होता. सशस्र टोळक्याने घरात घुसून कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून जबरी लूट केल्याची माहिती होती. दरम्यान या घटनेचा तपास पोलिसांनी लावला असून या प्रकरणातील नाशिक शहरातील आणि मध्य प्रदेशातील चार संशयित ताब्यात आहेत. आधी एक जण ताब्यात आला होता त्यानुसार इतरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल झाली असून चोरीच्या एकूण मुद्देमालापैकी १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा जवळपास ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
घडलेली घटना
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे एका बंगल्यात 12 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी लूट केली होती. संशयितांनी सुरुवातीला बंगल्यातील कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून घरात प्रवेश केला होता. बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि 8 लाख 50 हजारांची रोख रक्कम असा एकूण 17 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरांनी पळवून नेला होता. लूट करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. लुटीतील 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून यात चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतर दोन फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
 
17 लाख 34 हजारांची लूट केल्याची कबूली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढकांबे शिवारातील रतन बोडके यांच्या बंगल्यात बारा डिसेंबरला मध्यरात्री सात संशयितांनी प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत 28 तोळे सोन्याचे दागिने, साडेआठ लाख रुपये रोख अशी 17 लाख 34 हजारांची लूट केले होती. यानंतर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांवर सोपवला होता. यानंतर सखोल तपास करत माहितीच्या आधारे नाशिक येथून नैशाद शेख यास ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर मध्य प्रदेशातील साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून 17 लाख 34 हजारांची लूट केल्याची कबुली दिली आहे.
 
दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत वणी रस्त्यावरील ढकांबे गावात वस्तीवर ही घटना घडली होती. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हातात बंदूक घेऊन सात ते आठ जणांचे टोळके पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध देत घरात घुसले. बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबातील सदस्यांना घरातील दागिने, पैसे बाहेर काढण्यास सांगत जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाखोंचा मुदेमाल लुटून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
 
त्यानुसार पोलिसांनी घ्त्नास्थाली दाखल होत कसून चौकशी केली असता. नाशिक मधून एका संशयिताला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून इतर संशयितांचा माग घेतल्यानंतर या दरोड्याची उकल झाली आहे. तर या संशयितांविरुद्ध राज्यातील नाशिक, धुळे, औरंगाबाद, पुणे जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेश राज्यात दरोडा, जबरीचोरी आणि चोरी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
 
चोरीसाठी चक्क कुत्र्यांला गुंगीचे औषध पाजण्यात आले
नाशिकमध्ये 17 लाखांची लूट झाली आहे. या चोरीसाठी चक्क कुत्र्यांला गुंगीचे औषध पाजण्यात आले. 12 डिसेंबरला ही लूट झाली होती. आंतरराज्य टोळीकडून चोरी करण्यात आली आहे. अखेर आता पोलिसांना टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.
 
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे एका बंगल्यात 12 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी लूट केली होती. संशयितांनी सुरुवातीला बंगल्यातील कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून घरात प्रवेश केला होता. बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि 8 लाख 50 हजारांची रोख रक्कम असा एकूण 17 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरांनी पळवून नेला होता. लूट करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. लुटीतील 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून यात चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतर दोन फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
17 लाख 34 हजारांची लूट केल्याची कबूली :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढकांबे शिवारातील रतन बोडके यांच्या बंगल्यात बारा डिसेंबरला मध्यरात्री सात संशयितांनी प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत 28 तोळे सोन्याचे दागिने, साडेआठ लाख रुपये रोख अशी 17 लाख 34 हजारांची लूट केले होती. यानंतर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांवर सोपवला होता. यानंतर सखोल तपास करत माहितीच्या आधारे नाशिक येथून नैशाद शेख यास ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर मध्य प्रदेशातील साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून 17 लाख 34 हजारांची लूट केल्याची कबुली दिली आहे.
 
या आरोपींना अटक :
यात इरशाद शेख,रहमान शेख (राहणार नाशिक ) लखन कुंडलिया,रवी फुलेरी,इकबाल खान,भुरा फुलेरी( राहणार मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली,पोलीस यंत्रणेने मोठ्या शिताफीने आंतरराज्य सशस्त्र दरोडाच्या टोळीचा छडा लावला,या तपासातून संशयितांवर औरंगाबाद, धुळे, पुणे,नाशिक व मध्य प्रदेशात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची बाब पुढे आली आहे, पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास अधिकारी,कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती