विचारवंत, अभ्यासूंना राज्यसभेवर पाठवले जाते

गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:08 IST)
महाराष्ट्रातून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मात्र उमेदवाराची घोषणा केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांना उमेदवारी दिली जाईल अशीही एक चर्चा सध्या सुरू असल्याचे सांगितले जाते. या चर्चांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्या आला. ते मीडियाशी बोलत होते.  
 
विचारवंत, अभ्यासूंना राज्यसभेवर पाठवले जाते
पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांवर बंधू रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यसभेवर विचारवंतांना पाठवले जाते, वेगवेगळे पक्ष अभ्यासू लोकांना राज्यसभेवर पाठवतात. अशा लोकांना राज्यसभेवर पाठवल्यास त्याचा पक्षाला फायदा होतो. पार्थ पवार असेच उमेदवार आहेत. एखादा असा विचारवंत व्यक्ती राज्यसभेवर जात असेल तर त्याचा महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होऊ शकतो. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवावे असे अजित पवार यांचे मत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
 
दरम्यान, काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, संघटना बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेस पक्षाने हंडोरे यांनी उमेदवार देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा विजय नक्की आहे, दगाफटका करण्यास काहीही वाव नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती