“इंदुरीकरांना दोन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा द्यावी”

गुरूवार, 22 जून 2023 (07:37 IST)
उच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना पुढील अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) वतीने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र (कॅव्हेट) दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती अविनाश पाटील यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड बाबा अरगडे, अ‍ॅड. रंजना गवांदे पगार, विशाल विमल उपस्थित होते.
 
अविनाश पाटील म्हणाले, “इंदुरीकर महाराज यांची सततची महिलांसंबंधी अपमानजनक वक्तव्य आणि गर्भलिंग निदानासंबंधीचा दावा हा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, पुरुषीव्यवस्थेला खतपाणी घालणारा आणि समर्थन देणारा आहे. त्यामुळे इंदुरीकरांविरोधातील खटला सुरू ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश हा महाराष्ट्रातील स्त्रीभ्रूणहत्येला पोषक वर्तन व्यवहार करणाऱ्या सर्वांना चपराक देणारा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती