इंदोरीकर महाराज म्हणतात, मी मला कोरोना होवू देणार नाही असं म्हणा

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (15:55 IST)
आपल्या किर्तनातून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या इंदोरीकर अर्थात निवृत्ती महाराज देशमुख  यांनी कोरोनावर रामबाण उपाय सांगितलाय. कोरोन काळात हात धुणे, सँनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच आणखी एक उपाय सांगितलाय. मनाचा खंबीरपणा ठेवणे हा देखील रामबाण उपाय असल्याचे इंदोरीकर महाराज म्हणाले. लोणी येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलातील भाषणातून, 'नागरिकांनो घाबरुन जावू नका' असं आवाहन केलंय.
 
मला कोरोना होणारच नाही असं म्हणण्यापेक्षा मी मला कोरोना होवू देणार नाही असं म्हणायला हवं. मला अनेक उद्घाटनाला बोववलं जातं त्यावेळी असे आणखी व्यवसाय सुरु होतील असं म्हणत असतो. मात्र कोरोना सेंटरच्या उद्घाटनानंतर मला येथे दाखल होण्याची वेळ येवु नये. म्हणजेच दुसर कोरोना सेंटर सुरु करण्याची वेळ येवू नये असे इंदोरीकर महाराज म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती