वादानंतर सारथीच्या कार्यालयाचे उदघाटन

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (21:01 IST)
वादाच्या भोवऱ्यात अडकलेले नाशिकमधील सारथीच्या कार्यालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीचे विभागीय कार्यालय नाशिकरोड येथे उभारण्यात आले असून मराठा समाजातील मुलांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. सारथीच्या उदघाटन कार्यक्रम पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांचे नावच नसल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सारथी कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.
 
राज्यात सर्वसामन्यांना न्याय मिळाला पाहिजे हे आमचं ध्येय आहे. मधल्या काळात सारथी चा वेग मंदावला होता त्याची कारण काय यात मला जायचं नाही. मात्र आता नवीन सरकार आलं आहे. आपल्याला जोमाने काम करायचं आहे. चांगली वास्तू उभी राहिली आहे. उदात्त हेतू ठेवून सारथी चा विकास करायचा आहे. सारथीचे चिन्ह एक मुकुट आहे. परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान. 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, छत्रपती असून देखील संभाजी महाराज मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले, त्यांची भावना प्रामाणिक होती. हे जनतेतील सरकार आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. छत्रपतींनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केल्यावर धावपळ होणारच हाती. कुठे जायचे असेल, अंगावर घ्यायचं असेल तर आम्ही आहेच.
 
उदघाटन प्रसंगी संभाजी राजे म्हणाले, तीन वर्षापूर्वी सारथीच्या कामकाजाला सुरवात झाले होती. मात्र मध्यंतरी सारथी कामकाज बिघडले होते त्यावेळी मी आंदोलन केले होते.  मात्र मला आनंद आहे नाशिक मध्ये सारथी कार्यालय होतोय. सारथी साठी पुढाकार घेतल्याने सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा मी अभिनंदन करतो. एमपीएससी  पास झालेल्या मराठा समाजातील तरुणासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन नियुक्ती दिल्या.सारथीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळाले आहे. मराठा समाजासाठी आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावे लागेल असे देखील संभाजी राजेंनी सांगितले.
 
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीचे विभागीय कार्यालय नाशिकरोड येथे उभारण्यात आले आहे. नाशिकच्या नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात सारथीचे कार्यालय साकारण्यात आले आहे. 

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती