नागपूरमध्ये पुन्हा एकदा शनिवार, रविवार प्रशासनाकडून बंदचे आवाहन

शनिवार, 6 मार्च 2021 (07:24 IST)
नागपूरमध्ये पुन्हा एकदा शनिवार ६ मार्च आणि रविवार ७ मार्च रोजी प्रशासनाने बंदचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात ज्याप्रकारे नागपूरकरांकडून सहकार्य मिळाले, त्याचप्रकारच्या सहकार्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.
 
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांना एकजूटता, संयम व समर्थनाचा परिचय द्यावा लागेल. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १३९३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो अनियंत्रित होण्याच्या दिशेने आहे. तेव्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. शनिवार-रविवारच्या निर्बंधामध्ये यावेळी अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे. यात चिकन, मटण, अंडी यांची दुकाने सुरू राहतील. वाहन दुरुस्ती, वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने सुद्धा दोन्ही दिवशी सुरू राहतील. दुकान, बाजार, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहतील. प्रशासनातर्फे या काळात तपासणी मोहीम राबवली जाईल. यात नियम व कायद्याचे उल्लंघन करताना कुणी आढळून आले, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. मनपाच्या एनडीएस पथकातर्फे दररोज तपासणी केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती