विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते. आज दिवसभर पतंगबाजी सुरू होती. ही पतंगबाजी पाहूना माझं मनोरंजन झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला.
मी दिल्लीत गेलो होतो. नागपूरचं एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. धर्मेंद्र प्रधान यांची भेट घ्यायची होती. त्यांच्या भेटीला उशिर होता म्हणून अमित शहा यांना फोन केला. तर त्यांनी 15 मिनिटं आहेत, भेटायला येऊ शकतो म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यांची भेट घेतली. मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर पतंगबाजी होते. आज दिवसभर ही पतंगबाजी सुरू होती. त्यामुळे माझं मनोरंजन झालं, असं फडणवीस म्हणाले.
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली असेल तर त्याचं स्वागत करतो. काही हरकत नाही. देर आये पर दुरुस्त आये, असं ते म्हणाले. केंद्र सरकारडे इम्पिरीकल डेटा नाही. सेन्सस डेटा आहे. हे पॉलिटिकल रिझर्व्हेशन आहे. त्यामुळे राज्यालाच इम्पिरीकल डेटा गोळा करावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.