उद्धव ठाकरे टीव्हीवरच दिसले, त्यांचा कारभार दिसला नाही : राज ठाकरे

शुक्रवार, 31 जुलै 2020 (16:05 IST)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत तसेच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडला नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात. मुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे. त्यांना पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाहीय. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात”.
 
“मी घराबाहेर पडलो तर, माझ्याभोवती लोकांची गर्दी जमा होणार. त्यातून संसर्गाची भीती होती. म्हणून मी बाहेर गेलो नाही. पण सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं” असे राज ठाकरे म्हणाले. “आता लॉकडाउनमधून सोडवा अशीच सर्व लोकांची इच्छा आहे. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. लॉकडाऊन फार काळ करता येणार नाही. विरोधी पक्षाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही लोकांच्या मनातील भीती दूर होण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती