चिक्कीचा ब्रँड जर माझ्या नावाने वाढत असेल तर मला हरकत नाही

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (23:36 IST)
भाजपा शिवसेनेचं सरकार असताना चिक्की प्रकरणात पंकजा मुंडे यांनी आपल्यावरील बिनबुडाचे असल्याचं वारंवार सांगितलं आहे. चिक्की प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायालयाच्या आदेशाबाबत माध्यमांमध्ये चुकीची माहिती आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
निर्णयात पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी पावलं उचलली. शिक्षक भरती हा एकमेव विषय नाही. तुम्ही मला बघितलं की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अत्यंत सुंदर काम आहे, असे अनेक निर्णय मी घेतले आहेत. यामध्ये पारदर्शक निर्णय आहेत. तितकाच हा पण निर्णय आहे. त्यामुळे असे विचार माझ्या डोक्यात येऊच शकत नाही. मात्र आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात असे विचार येऊ शकतात. त्यांना दोष देत नाही, कारण त्यांची पर्सनालिटीच तशी आहे. त्यांना कुठेही पैसा दिसतो. कुठेही माफिया दिसतो. कुठेही भ्रष्टाचार दिसतो, ते आरोप करणारच. मी माझं म्हणणं स्पष्ट मांडलं आहे. मी माझा निर्णय अगदी शुद्ध मनाने घेतला आहे. चिक्कीचा ब्रँड जर माझ्या नावाने वाढत असेल. ते खाऊन लोकांचं आयर्न वाढत असेल. मला हरकत नाही”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती