माझी युती तोडण्याची इच्छा नाही - उद्धव ठाकरे

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (09:47 IST)
शिवसेनेचे सत्ता केंद्र असलेल्या मुंबई येथील मातोश्रीवर शिवसेना आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार  उद्धव ठाकरे अद्यापही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत असे समजते आहे. यामुळे भाजपा आणि शिवसेनेमधील तिढा अजून वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं कळत आहे. भाजपा आमदार फोडेल या भीतीपोटी आणि कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनच्या सर्व आमदारांना रंगशारदा येथे मुक्कामी ठेवले आहे. 
 
सर्वांची बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पदावर ठाम आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं सांगितलं. सोबतच उद्धव ठाकरे शिवसैनिक, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नुसार लोकसभेदरम्यान जे ठरलं होतं ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत म्हणाले आहे. जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.सोबतच माझी युती तोडण्याची अजिबात इच्छा नसून, भाजपने योग्य निर्णय घ्यावा असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती