म्हणून राज ठाकरे विद्यार्थ्यांच्या सत्काराला जात नाही

सोमवार, 2 मार्च 2020 (12:02 IST)
“दहावीला मला ३७ टक्के होते. त्यामुळेच बोर्डात पहिला क्रमांक आलेल्या, दुसरा क्रमांक आलेल्या आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार करायला मी जातच नाही असे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. 
 
यावेळी बोर्डात पहिला क्रमांक आलेल्या, दुसरा क्रमांक आलेल्या आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार कुठल्या तोंडाने जायचं असा प्रश्न पडतो. एकदाच मी असा सत्कार केला होता. तेव्हा भाषणात मी लोकशाही याचा म्हणतात असं सांगितलं होतं. ज्याला बोर्डात ३७ टक्के पडलेत तो बोर्डात आलेल्याचा सत्कार करतोय याला लोकशाही म्हणतात असं मी म्हणालो होतो,” अशी आठवण राज यांनी करुन दिली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती